🌟पुर्णेत भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.....!


🌟या बैठकीत भाजप पुरस्कृत रासप उमेदवार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार🌟 

पुर्णा (दि.०७ नोव्हेंबर २०२४) :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डाॅ.रत्नाकर गुट्टे याच्या प्रचारासह विजयाची रणनिती ठरवण्या संदर्भात आज गुरुवार दि.०७ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२.०० वाजेच्या सुमारास पुर्णा शहरातील जुना मोंढा परिसरातील श्रीराम मंदिर जवळील सभागृहात पुर्णा शहर भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीस भारतीय जनता पार्टी,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्त्यांनीं यावेळी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना निवडून आणण्यासाठी एकमताने ठराव घेतला यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमताने मेहनत घेऊन डॉ.रत्नाकर गुट्टे काकांना बहुमताने निवडून आणावे  असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष प्रशांत कापसे यांनी केले.

 या बैठकीस गणेशदादा रोकडे,नरहरी ढोणे,आनंदराव पारवे,बालाजी कदम,माऊली कदम,बालाजी वट्टमवार,बळीराम कदम,हनुमान अग्रवाल,विलास कदम,गणेश कदम,मधुकर मुळे,वैभव भायेकर,प्रभुदयाल ओझा,भारत एकलारे,रत्नामाला एकलारे,सुवर्णा बिछडे,भालेसर विश्वानाथ भायेकर आदींसह मान्यवरांसह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या