🌟शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक : आदित्य ठाकरे यांची सभागृह नेते पदावर निवड🌟
💫 संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या कडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्याची जवाबदारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह ठरवतील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ?; मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव पुढे ; 29 नोव्हेंबरला सरकार स्थापन होण्याची शक्यता ; शिवसेना एकनाथ शिंदेंच्या आमदारांची मागणी, साहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा ; त्यावर काम सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सूचक वक्तव्य
💫 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 'ओके'; RSS चा / राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही ग्रीन सिग्नल ; दोन वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का? प्रीतिसंगमावर अजित पवार थेट म्हणाले, आमचं आम्ही बघू, सर्व आमदार माझ्यासोबत
💫 होय, मला ट्रम्पेटचा लाभ झाला ; दिलीप वळसे पाटलांची प्रांजळ कबुली,शरद पवार व अजित पवार एकत्र येण्याबाबत म्हणाले, आधी मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ जाहीर होऊ द्या त्यानंतर पाहू ; 5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, दिग्गज नेतेही झाले पराभूत
💫 आधी रोहित पवारांना खाली वाकून नमस्कार करायला लावले, कराडमधील प्रितीसंगमावर अजित पवार व रोहित पवारा या काका पुतण्याची भेट; अजित पवारांनी रोहित पवारांना म्हटलं, मी सभा घेतली असती तर तुझे अवघड झालं असते ; मी कटाचा बळी ठरलो; कौटुंबिक कलहामध्ये करार, अजितदादा पवार व रोहित पवारांच्या भेटीनंतर राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
💫 शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे शिवसेना ठाकरे गटाचे गटनेतेपद ; मनसेचे उमेदवार म्हणाले, भाजपसोबत जाणे ही खूप मोठी चूक झाली; राज ठाकरेंसमोर बैठकीत नाराजी जाहीर केली!
💫 विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ट्रम्पेटनं डाव साधला, शरद पवारांच्या पक्षाला तब्बल 9 जागांवर फटका; अनेक ठिकाणी 'सातारा' पॅटर्न ; नाशिक जिल्ह्यामध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, शरद पवारांपेक्षा अजित पवार ठरले भारी!
💫 संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते का केलं असेल ? काही कळत नाही ; सत्यजित तांबेंनी घेतली अजित पवारांची भेट, बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर अजितदादा पवारांनी व्यक्त केलं दुःख
💫 फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ; मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, सोशल मीडियावरील चर्चेनंतर निवडणूक आयोगाचं उत्तर, तांत्रिकदृष्ट्या शक्य
💫 मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी ; कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा प्लॅन, सरकारकडून ग्राहकांना 35 रुपये दरानं मिळतोय कांदा
💫 पोरांनी पर्थचे मैदान मारलं! टीम इंडियाने कांगारुंना 295 धावांनी लोळवलं, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी ; आयपीएल लिलावात मुंबईकरांना मिळाला नाही लिलावात भाव! पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, अजिंक्य रहाणे अनसोल्ड
💫 लढाई विधानसभेची :सासऱ्यांवर गोळीबार, वडिलांचा संघर्ष, हितेंद्र ठाकूर हद्दपार, वसईत स्नेहा दुबे विजयी
💫निवडणूक निकाल लागताच सीएनजी गॅस दर भडकला ; गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या