🌟परभणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तर्फे उद्या रविवार ०१ डिसेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर.....!


🌟या शिबिरात अवयवदाना विषयी जनजागृती व रक्तदानही केले जाणार🌟

परभणी (दि.३० नोव्हेंबर २०२४) : परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र त्रिधारा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या परभणी शाखेतर्फे उद्या रविवार दि.०१ डिसेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

           अमावस्येनिमित्त येथील ओंकारनाथ मंदिरात दर्शनाकरीता येणार्‍या हजारो भाविकांकरीता हे शिबीर प्रामुख्याने आयोजित करण्यात आले असून रविवारी सकाळी ०९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत आरोग्य तपासणी केली जाणार आहे तसेच अवयवदानाविषयी जनजागृती व रक्तदानही केले जाणार आहे भाविकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी परिषदेने केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या