🌟भारतीय उद्योजक अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेत २ हजार कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी खटला...!


🌟भारतीय शेअर बाजारातील अदाणी समूहाचे शेअर्स कोसळल्याने गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला🌟

नवी दिल्ली : भारतीय उद्योजक तथा अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेतील न्यायाधीश मंडळाने २ हजार कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी खटला दाखल केला आहे. आज पहाटे हे वृत्त भारतात धडकल्यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदाणींवर टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीडे भारतीय शेअर बाजारातील अदाणी समूहाचे शेअर्स कोसळल्याने गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे.

भारतीय उद्योजक गौतम अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कँत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली. ज्यामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांचे नुकसान झाले, असा आरोप अमेरिकेतील सरकारी एजन्सीने ठेवला आहे. या संदर्भात त्यांच्या विरुद्ध अमेरिकेतील न्यायालयात फौजदारी आणि दिवाणी खटलाही दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी हे वृत्त बाजारात धडकताच त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. अदाणी समूहाची प्रमुख कँपनी असलेल्या अदाणी एंटरप्राईजेसच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची घसरण दिसली. तर अदाणी एनर्जी सोल्यूशनही लाल रंगात रंगले. अदाणी ग्रीन एनर्जी कँमनीला कँत्राट मिळविण्याबद्दल लाच दिल्याचा आरोप ठेवला गेला. या कँपनीच्या शेअरमध्ये १९.१७ टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळाली. अदाणी टोटल गॅस १८.१४ टक्के, अदाणी पॉवर १७.७९ टक्के आणि अदाणी पोर्ट्समध्ये १५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. याशिवाय अंबुजा सिमेंट्सच्या शेअरमध्ये १४.९९ टक्के तर एसीसी शेअरमध्ये १४.५४ टक्क्यांची घसरण झाली. अदाणी यांची समूह कँपनी असलेल्या एनडीटीव्हीच्या शेअरमध्येही १४.३७ टक्क्यांची घसरण झाली. तर अदाणी विल्मारमध्ये १० टक्क्यांची घसरण झाली. आज  सकाळी अदाणी समूहातील तीन प्रमुख कँमन्यांचे शेअर जवळपास २० टक्क्यांनी खाली आल्यामुळे एकूणच अदाणीच्या ११ शेअरवरही परिणाम दिसून आला. अदाणी समूहाचे बाजारमूल्य २ लाख कोटींनी घटले. जानेवारी २०२३ मध्ये हिडेंनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदाणी समूहाची ही आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी असल्याचे बोलले जात आहे.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून हल्लाबोल :-

अमेरिकेत अदाणींवर भ्रष्टाचाराचा खटला दाखल झाला असून त्यांच्या विरुध्द अटक वॉरंट जारी झाल्याचे वृत्त भारतात झळकताच काँग्रेसने अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची संयुक्त संसदीय मार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदाणींकडे असलेला पैसा हा पंतप्रधान मोदी व भाजपचा असल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी सातत्याने अदाणींना पाठीशी घालत आहेत. कारण अदाणी फसले तर पंतप्रधान मोदी देखील फसणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवर केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या