🌟परभणी जिल्ह्यातल्या पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत आष्टी फाट्यावर जिल्हाधिकारी यांनी केली वाहन तपासणी....!


🌟यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पथकाच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना महत्वाच्या सूचना केल्या🌟

परभणी (दि.१३ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काल मंगळवार दि.१२ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत आष्टी फाटा येथील एस.एस.टी.पथक स्थळी भेट देवून प्रत्यक्ष वाहनाची तपासणी केली.

                जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात भेटी देवून निवडणूक कामाचा आढावा घेत आहेत त्या अनुषंगाने मंगळवार दि.१२ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी आष्टी फाटा येथे भेट देवून वाहनांची तपासणी केली. तसेच पथकाच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक जनार्दन विभुते, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पाथरी शैलेश लाहोटी, पाथरी तहसीलदार शंकर एन. हांदेशवार, तहसीलदार पांडुरंग माचेवाड,पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम आदींची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या