🌟महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी १२ ओळखीचे पुरावे ग्राह्य धरणार...!


🌟यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदान करतांना ग्राह्य धरला जाणार🌟

परभणी (दि.०९ नोव्हेंबर २०२४) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून जिल्ह्यातील चारही मतदार संघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या ई-पीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर १२ ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदारांना मतदान केंद्रावरील अधिकार्‍यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदार करता येणार आहे.

             आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजने अंतर्गत जारी केलेले विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेव्दारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचा-यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र अशी  12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदांराची माहिती चिट्ठी मतदारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ग्राह्य असणार नाही.

           मतदानासाठी ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहेत ते मतदार, मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. मतदार ओळखपत्र (ई-पीक) सादर करणे शक्य नसल्यास इतर १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक ओळखपत्राचा उपयोग करुन मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या