🌟पुर्णेतील भारतीय स्टेट बँकेतील मानवतेचा स्पर्श असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे मयताच्या कुटुंबाला मिळाला १२ लाखाच धनादेश.....!


🌟नगर परिषदेचे मयत कर्मचारी राहूल कांबळेंनी लोन घेतांना काढली होती एसबीआय लाइफ इन्शुरन्सची स्मार्ट प्लेटिना प्लस पॉलिसी🌟

पुर्णा (दि.१४ नोव्हेंबर २०२४) :- पुर्णा शहरातील भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक अमित कुमार जोंधळे,इन्शुरन्स अधिकारी बाहुबली इंदलवार,क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र चौरिया,शिवराज लाखावर या अधिकाऱ्यांच्या तत्पर व समर्पित सेवेमुळे पूर्णा येथील श्रीमती दिक्षा राहुल कांबळे यांना इन्शुरन्स पॉलिसीचा बारा लाख रुपयाचा चेक प्रदान करण्यात आला त्यांचे पती राहुल कांबळे नगरपालिकेमध्ये कर्मचारी होते त्यांनी एसबीआय लाइफ इन्शुरन्सची स्मार्ट प्लेटिना प्लस पॉलिसी लोन घेताना घेतली होती. 

काही महिन्यापूर्वी त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या नॉमिनी दीक्षा राहुल कांबळे यांच्याशी बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला संपर्क झाल्यानंतर दीक्षा कांबळे यांनी योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करून बँकेत सादर केले मयत राहुल कांबळे यांनी फक्त एकच पॉलिसीचा हप्ता भरला होता दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी बँकेमध्ये दीक्षा कांबळे यांना बोलावून घेऊन बारा लाख रुपयाचा चेक त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला माणुसकीचा आणि मानवतेचा स्पर्श असलेले एसबीआय शाखा पूर्णेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्य भावनेने तत्परतेने ही मदत त्यांना मिळवून दिली .

या त्यांच्या कार्यामध्ये मदत करण्याचं काम बँकेचे कर्मचारी शेख फिरोज ,शेखहमीद, गजानन महाजन यांनी मोलाचे सहकार्य केले मुख्य व्यवस्थापक अमित कुमार जोंधळे यांच्या कल्पक अभिनव व लोकाभिमुख तत्पर बँकिंग सेवेमुळे विविध कल्याणकारी योजना जन माणसांमध्ये पोहोचत आहेत त्यांच्या या तत्पर सेवेमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या