🌟पुर्णा शहरामध्ये संविधान दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न....!

🌟भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करुन संविधान दिन सोहळ्याला सुरुवात🌟


पुर्णा (दि.२६ नोव्हेंबर २०२४) :- भारतीय बौद्ध महासभा बुद्ध विहार समिती धम्म सेवेत कार्यरत असलेली महिला मंडळ व भारतीय संविधानावर प्रेम करणारी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या प्रमुख संयोजनाखाली आज मंगळवार दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता पुर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या व महिला मंडळ पदाधिकाऱ्याचे हस्तें भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत संविधान दिन सोहळ्याला सुरुवात झाली.

यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व भारतीय संविधान गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे माजी उपनगराध्यक्ष गटनेते उत्तम भैया खंदारे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित माजी नगरसेवक अशोकराव धबाले भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णाचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी प्रास्ताविक तर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत भारतीय संविधानाचे अभ्यासक प्रकाश कांबळे नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष गटनेते उत्तम भैया खंदारे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित यांनी भारतीय संविधानावर यथोचित प्रकाश टाकला. 

भारतीय संविधानाची राज्यकर्त्याकडून योग्य त्या पद्धतीने अंमलबजावणी न झाल्यामुळे घटनाकारांना अभिप्रेत असलेला भारत देश निर्माण होऊ शकला नाही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक समता आणावयाची होती या देशातील आपल्या न्याय नैसर्गिक हक्कापासून दूर असलेला जो समाज आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे होते सर्वधर्म समभाव सामाजिक सहिष्णता निर्माण करू न देशाची सर्वांगीण प्रगती करावयाची होती परंतु राज्यकर्त्याकडून ते शक्य झाले नाही. 

अशाप्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या संविधाना प्रस्ताविकेचे वाचन मंजुषा ताई पाटील यांनी केले बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले बौद्धाचार्य अमृत कऱ्हाळे,अतुल गवळी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास महिला मंडळाचे पदाधिकारी संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या