(सेलू : येथील सेवानिवृत्त शिक्षक अशोकराव चामणीकर,सौ आश्विनी चामणीकर,बाळकृष्ण आजेगावकर यांचा सत्कार करताना विक्रम देशमुख,अर्चना देशमुख व इतर)
🌟75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुलांनी साजरा केला दिमाखदार सोहळा🌟
सेलू (दि.14 नोव्हेंबर 2024) - सध्याच्या काळात अनेक उदाहरणे अशी दिसतात की मुले आपल्या आई वडिलांना विचारत नाहीत,वृद्धाश्रमात अनेक आई वडील शेवटचे दिवस दुःखात घालवतात परंतु अशा काळात मुलांनी आपल्या वडिलांची पंचाहत्तरी साजरी करणे म्हणजे समाजासाठी आदर्श आहे.
येथील श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा सेवानिवृत्त शिक्षक अशोकराव चामणीकर यांचा 75 वा वाढदिवस त्यांच्या मुलांनी छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या थाटात संपन्न केला.यावेळी व्यासपीठावर अशोकराव चामणीकर,पत्नी अश्विनी चामणीकर,व्याही बाळकृष्ण आजेगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात अशोकराव चामणीकर व त्यांच्या पत्नी अश्विनी चामणीकर तसेच बाळकृष्ण आजेगावकर यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात अशोकराव चामणीकर यांना 75 दिव्यांनी ओवाळून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.माजी लिपिक मधुकर कुलकर्णी,माजी मुख्याध्यापक पी एस कौसडीकर ,अलोक चामणीकर,अतुल चामणीकर,लक्ष्मीकांत पाटोदकर,प्रसिद्ध कीर्तनकार कल्याणी चामणीकर,विक्रम देशमुख,अर्चना देशमुख यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी चामणीकर यांनी शिक्षक म्हणून असंख्य विद्यार्थी घडवले,गायन,शिक्षक,धार्मिक,सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात कार्य केले आहे.आजही त्यांचे अनेक विद्यार्थी देशासह परदेशात आहेत.या कार्यक्रमात चामणीकर यांनी आवडती गीते सादर केली.हार्मोनियमवर कस्तुरी अलोक चामणीकर हिने साथ दिली.
सत्काराला उत्तर देताना अशोकराव चामणीकर म्हणाले की,आयुष्यात मी चारित्र्याला जास्त महत्व दिले.कधी कुणाचे मन दुखावले नाही,शिक्षक म्हणून आपणच स्थापन केलेल्या शाळेत कार्य करतांना सतत विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा विचार केला.आणि आयुष्यात आनंदी राहणे याकडे जास्त लक्ष दिले.यामध्ये माझ्या कुटुंबाने आणि पत्नीने मला साथ दिली.यावेळी विविध भेटवस्तू देऊन अशोकराव चामणीकर यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलोक,अतुल,कीर्तनकार कल्याणी,मेधा चामणीकर,विक्रम देशमुख,अर्चना देशमुख आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी अध्यात्मिक भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलोक चामणीकर तर आभार जावई विक्रम देशमुख यांनी मानले.या कार्यक्रमास श्रीकांत चिटणीस यासह चामणीकर परिवारातील सर्व सदस्य,मुले,सुना,नातवंडे मित्र परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.......
0 टिप्पण्या