🌟मुंबईतील महायुतीच्या नेत्यांची आजची बैठक रद्द🌟
मुंबई (दि.२९ नोव्हेंबर२०२४) दिल्लीत काल २८ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या झालेल्या बैठकीनंतर आज शुक्रवार दि.२९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक होणार होती अमित शाहांनी दिलेल्या सुचना आणि आदेशानुसार महाराष्ट्रात सत्तास्थापने संबंधी पुढील निर्णय घेतले जाणार होते. महायुतीची ही बैठक पुढील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक रद्द झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही महत्त्वाची बैठक सुरू होती. पुढील दोन दिवस ही बैठक पुढे ढकलल्याने सत्तास्थापनेतही उशीर होणार का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोरच अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी केली. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेसाठी १२ मंत्रिपदांची मागणी केली आहे
इतकेच नव्हे तर विधानपरिषदेच्या सभापतीपदाचीही मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या १२ मंत्रिपदांमध्ये गृहखाते आणि नगरविकास खात्यांचीही मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. पालकमंत्रीपद देतानाही पक्षाचा योग्य सन्मान राखावा. पण केंद्रीय नेतृत्त्वाकडून यासंर्भात शिंदेंना कोणतेही आश्वासन देण्यात आल्याची माहिती नाही. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर असल्याच्याही चर्चा होत्या. पण त्यांनी केंद्रात जाऊ नये. असा आग्रह शिदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा अनुभव पाहता त्यांनी केंद्रात न जाता महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय राहावे, अशी प्रतिक्रीया आमदार शंभुराज देसाई यांनी दिली आहे. याशिवाय राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात महिला आमदारांनाही मोठी संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. चार महिला आमदारांची वर्णी लागू शकते, यात अजित पवार गटाच्या ४, शिंदे गटाच्या २ महिला आमदार सध्या विधानसभेत आहेत.
तर २ टर्मपेक्षा अधिक काळ निवडून येणाऱ्या महिला आमदारांनाहीमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने संबंधित महिला आमदारांच्या सर्व प्रोफाईल्स दिल्लीतील केंद्रीय नेतृत्त्वाने मागवल्याची माहिती आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अजून दोन-तीन दिवस लागण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं यासाठी भाजपकडून दबावाचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईला न जाता थेट त्यांच्या मूळगावी सातारा येथे गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील महायुतीची बैठक दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.....
0 टिप्पण्या