🌟सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार फुलचंद भगत यांना यंदाचा 'महाराष्ट्र आयकाॅन पुरस्कार'.....!


🌟पुरस्कार जाहीर झाल्यामुळे भगत यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे🌟

वाशिम:-सर्वपरिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि युवा पञकार फुलचंद भगत यांना 'महाराष्ट आयकाॅन पुरस्कार-२०२४ जाहीर झाला असुन दि.३० नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे एका दिमाखदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्कार जाहीर झाल्यामुळे भगत यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.

                 यहोवा यिरे फाऊंडेशन व कलाजीवन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड यहोवा सोबत पूर्ण जीवन यहोवाचे साक्षीदार फाउंडेशन आणि कलाजीवन मानवतावादी संस्था भारत सरकार 2024 कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय REG NO NPL3855290 8 MAH/REG. दिला जाणारा ३६३ महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड-2024 हा पुरस्कार फुलचंद एन.भगत पञकार आणि सामाजिक कार्यकर्ते एन टीव्ही न्यूज मराठी वाशिम यांना जाहीर झाला आहे.महाराष्ट्र आयकाॅन पुरस्कार 2024 हा महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि कला सेवेतील नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल 2024 चा महाराष्ट्र सन्मान निधी पुरस्कार आहे.  प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार  प्रदान केला जात आहे. त्यामध्ये श्री. भयप येरमे. सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास एम्प्लॉयमेंट इनोव्हेशन ब्युरो, चंद्रपूर आणि श्री महेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदुरबार,लावणी सम्राज्ञी शिल्पा शाहीर,डाॅ.सोनाली खञी,आंतरराष्टीय मेकअप आर्टीष्ट पुनम गोकुलपुरे,माॅडेल आणी अभिनेञी महिशा मडावी,डि.के.अहिरकर,गौतम कोटवाल यांच्यासह इतर मान्यवर व  पाहुणे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. हा सोहळा 30 नोव्हेंबर 2024 रोजी आरके सेलिब्रेशन हॉल, आरमोरी रोड गडचिरोली येथे होणार आहे. 

            समाजपयोगी व जनसामान्यांना अग्रस्थानी ठेवून आपल्या लेखणीच्या माध्यमातुन सर्वसामान्यांचे विविध प्रश्न,समस्या शासनदरबारी पोहचुन न्याय मिळवून देणारे,परिसरात घडणार्‍या घटना घडामोडीचे जलद वार्तांकन करणारे युवा पञकार तथा सामाजीक कार्यातुन वेगळा ठसा ऊमटवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळख असणारे फुलचंद भगत यांना यंदाचा ऊत्कृष्ट आणी पञकारीतेमधील अतुलनिय कार्याचा गौरव म्हणून 'महाराष्ट आयकाॅन अवार्ड' जाहीर झाला आहे.फुलचंद भगत यांना याआधीही पञकारीता आणी सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.गोरगरीब लोकांच्या हितासाठी सतत आपली लेखणी झिजवुन जनसामान्यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांना वाचा फोडुन त्यांना तत्परतेने न्याय देण्यासाठी नेहमी झटत असणार्‍या भगत यांना पञकारितेमधिल पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातुन कौतुक आणी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.शासन प्रशासन तसेच जनता यामधील दुवा बनुन व विविध शासकिय योजना गरजु व पाञ लाभार्थ्यापर्यत पोहचवण्यासाठी मदत करणे,शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी आदी घटकांना न्याय मिळवुन देण्यात भगत यांचा नेहमी पुढाकार घेत असतात.गोरगरिबांना सदैव मदतीचा हात देवुन महिला सक्षमीकरणासाठी,लोकहित जोपासत विविध सामाजिक प्रश्नावर आपल्या लेखणीव्दारे प्रकाश टाकुन न्याय मिळवुन देण्याची भुमिका पञकार पुलचंद भगत यांची असल्याने त्यांना हे मिळालेले पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचा अनेकांनी कौतुक केले आहे.यंदाचा राज्यस्तरीय 'महाराष्ट आयकाॅन पुरस्कार विविध क्षेञातील नामवंत मान्यवरांच्या ऊपस्थीतीत दि.३० नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे होत असलेल्या दिमाखदार सोहळ्यात सदर पुरस्कार पञकार फुलचंद भगत यांना प्रदान करण्यात येणार आहे.हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या