🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळसात महाविकास आघाडी उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलतांना ते म्हणाले🌟
पुर्णा (दि.१६ नोव्हेंबर २०२४) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील नवा मोंढा परिसरात आज शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य संवाद सभेत बोलतांना परभणी जिल्ह्याचे खासदार तथा शिवसेना उपनेते संजय उर्फ बंडू जाधव म्हणाले की महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनदा विशाल विजयकुमार कदम यांच्या रुपाने शेतकरी पुत्राला उमेदवारी दिली असून सुजाण मतदार जनतेने विधानसभेत सर्वसामान्य जनतेसह शेतकरी शेतमजूरांचा आवाज बुलंद करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांना बहुमताने विजयी करावे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशालभाऊ कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित ताडकळस येथील नवा मोंढा परिसरातील संवाद सभेला ताडकळससह आसपासच्या गावांतील जनसमुदाय प्रचंड संख्येने यावेळी उपस्थित होता या भव्य संवाद सभेला शिवसेना उपनेते तथा परभणी लोकसभेचे लोकप्रिय खासदार संजय जाधव,कॉंग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख,पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बालासाहेब देसाई,अभिजीत देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुर्णा तालुकाध्यक्ष शहाजी देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे,रामनारायण मुंदडा,ॲड. कु.प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील युवती जिल्हा प्रमुख युवासेना (उ.बा.ठा) परभणी आदींची उपस्थिती होती.
यावेळी भव्य संवाद सभेत बोलताना सायखेडा साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित देशमुख यांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा ऊस यापुढे शेतात राहणार नाही असे अभिवचन दिले यावेळी बोलताना कॉंग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांनी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यास सोयाबीनला ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
महाविकास आघाडी उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद सभा यशस्वीतेसाठी शिवसेना तालुकाप्रमुख काशीनाथ काळबांडे, सरपंच गजानन आंबोरे पाटील, उपसरपंच प्रतिनिधी संजय जल्हारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल भोसले, रंगनाथ भोसले, माणिक हजारे, गोपाळ आंबोरे, दलित आघाडीचे सुरेश मगरे, रायुकाँ तालुकाध्यक्ष गजानन कदम, सर्कलप्रमुख गजानन शिराळे, फेरोज पठाण, संचालक देवानंद नावकीकर, उपसभापती अंकुशराव शिंदे, काँग्रेस आयचे शहराध्यक्ष दिपक आंबोरे, बबलू माने, व्यंकटराव पौळ, संचाल कनंदकिशोर मुंदडा, पंडितराव जाधव, उपशहरप्रमुख अनिल नरवटे, शेख शहेजाद, शेख अलिशा, शरद आंबोरे, व्यंकटेश पवार आदीं विशेष प्रयत्न केले.......
0 टिप्पण्या