🌟हिंगोली जिल्ह्यातील हिवरखेडा शिवारात बिबट्याचा शेतकऱ्यांवर हल्ला....!


🌟बिबट्या आल्याच्या बातमी मुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण🌟 

✍️शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली (दि.०४ डिसेंबर २०२४) - हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव  तालुक्यातील हिवरखेडा  शिवारात आज बुधवार दि०४ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०२.०० वाजता घोरदरी येथील शेतकरी प्रविण नागूलकर हें त्याच्या शेतात तुरीवर फवारणी करतांना अचानकपणे बिबट्याबे हल्ला केला आहे मात्र  या हल्यात त्याना ते बाल बाल बचावले आहेत या आधी देखील हिवरखेडा येथील वरदडा शिवारात बिबट्या आढळून आला होता या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे 

 🐆बिबट्या आल्याच्या बातमी मुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण :-


सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील वरदडा शिवारात घोरदरी येथील शेतकरी प्रवीण नागूलकर यांच्या वर बिबट्या आज दुपारी ०२.०० वाजताच्या सुमारास हल्ला केला आहे मात्र या हल्यात ते बाल बाल बचावले आहेत प्रविण नागूलकर यांच्या धाडसमुळे त्याच्या जीव वाचला आहे नागूलकर यांनी पेट्रोल पंपाचा फवारा त्याच्या अंगावर धरला व पेट्रोलपंपाचा आवाज वाढवला त्यामुळे त्याचा जीव वाचला बिबट्या आल्याची माहिती गावात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 दरम्यान, हिवरखेडा येथील  ग्रामस्थांनी  तातडीने वन विभागालाही याची माहिती दिली आज दि०४ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०२.०० वाजताच्या सुमारास प्रवीण नागूलकर  यांच्या वर हल्ला केला आहे नागुलकर साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत या आधी देखील हिवरखेडायेथे दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी  वरदडा शिवारात  बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते  वनविभागाच्या वतीने त्या परीसरात पाहणी देखील केली होती   वनविभागाच्या वतीने  वन परीक्षत्र अधिकारी माधव केंद्रे वनपाल जी एस साठे   व  वनरक्षक ढगे सर .व  वनमजूर डी वाय काळे होडेबे वनविभाग कर्मचारी यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून माहिती घेतली. घटना स्थळाजवळ व काही अंतरावर प्राण्याच्या.पायाचे ठसे आढळून आले. या ठश्यांचे छायाचित्र घेण्यात आले असून त्यावरून तो प्राणी बिबट्याच आहे असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडुन सांगण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जातांना काळजी घ्यावी एकटे शेतात जाऊ नका असे आव्हान वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या