🌟पुर्णा तालुक्यातील भाटेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.लक्ष्मीबाई दौलतराव कऱ्हाळे यांची बिनविरोध निवड....!


🌟सरपंचपदावर सौ.लक्ष्मीबाई कऱ्हाळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟


पुर्णा (दि.०४ डिसेंबर २०२४) - पुर्णा तालुक्यातील भाटेगाव ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडीसाठी आज बुधवार दि.०४ डिसेंबर रोजी सहाय्यक महसूल अधिकारी श्रीमती उज्ज्वला पुल्लेवार,मंडळ अधिकारी श्रीमती कल्पना शेलगावकर,तलाठी राजेंद्र भायेकर,ग्रामसेवक संजय बोबडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या संमतीने भाटेगाव ग्रामपंचायत सरपंचपदावर सौ.लक्ष्मीबाई दौलतराव कऱ्हाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यांवेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंचपदावर सौ.लक्ष्मीबाई कऱ्हाळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या