🌟पुर्णा तालुक्यातील आडगाव सुगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड संपन्न....!


🌟शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेश नारायन कस्तुरे तर उपाध्यक्षपदी सौ.कोमल साहेब राजभोज🌟


पुर्णा (दि.०४ डिसेंबर २०२४) - पुर्णा तालुक्यातील आडगाव सुगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीची आज बुधवार दि‌.०४ डिसेंबर रोजी सरपंच बालाजीराव शिरगोळे व उपसरपंच कैलास पिडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर मुख्याध्यापक रमेश वाटोळे व केंद्र प्रमुख कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी राजेश नारायन कस्तुरे तर उपाध्यक्षपदी सौ.कोमल साहेब राजभोज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

आडगाव सुगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पुढील प्रमाणे वर्ग १ ला राजेश नारायण कस्तुरे,महादेवी संदिप चौगुले,वर्ग २ रा शाहुबाई शिवप्रसाद चौकुले,वर्ग ३ रा विश्वनाथ रुस्तुमराव नलबले,अंकुश हरिभाऊ पिडगे,वैशाली सदाशिव पिडगे,वर्ग ५ वा कोमल साहेब राजभोज (उपाध्यक्ष),राजेश आगलावे,शिक्षण तज्ञ प्रभाकर बालाजी पिडगे,ग्रा.पं.प्र.फुलाबाई गंगाधर चौकुले आदींची सदस्य पदावर बिनविरोध निवड करण्यात आली असुन यावेळी काशिनाथ पिडगे गुंडाप्पा पिडगे,माजी सरपंच प्रभाकर पिडगे,ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौगुले आदी मान्यवरांची उपस्थिती होती......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या