🌟पत्रकारांनी सामाजिक स्वास्थ्याबरोबरच स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लखमावार


🌟मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त परभणीत पत्रकार आणि कुटूंबीयांची आरोग्य तपासणी संपन्न🌟 


परभणी (दि.०३ डिसेंबर २०२४) - पत्रकारांनी सामाजिक स्वास्थ्य जपत असतांना आपल्या व आपल्या कुटूंबींयाच्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करु नये सामाजिक स्वास्थ्या बरेाबरच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पत्रकारांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांकडून नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळत असून परभणी जिल्ह्यातील पत्रकार व त्यांच्या नातेवाईंकाच्या स्वास्थ्यासंदर्भात जिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा तर उपलब्ध आहेतच, शिवाय कोणत्याही खाजगी रुग्णालयात गरज पडल्यास आपण मदत करण्याचं आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश लखमावार यांनी दिले.

परभणी येथील येथील देवगिरी मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये आज मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिननिमित्त पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली परभणी मराठी पत्रकार संघ आणि देवगिरी मल्टी सुपरस्पेशालीटी हॉस्पीटलच्या वतीने आज 3 डिसेंबर रोजी या तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले या शिबीरामध्ये रक्ताच्या विविध तपासण्या, इसीजी, यासह जवळपास 10 तज्ञ डॉक्टरांनी पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटूबीयांची तपासणी केली. रुग्णालयाच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजगोपाल कालानी यांच्यासह डॉ. एकनाथ गबाळे, डॉ. अजय कुंडगीर, डॉ. निहार चांडक, डॉ. राहूल टेंगसे,  डॉ. सुर्यतळ, डॉ. संदिप वानखेडे, डॉ. मनोज मोरे, डॉ. प्रसाद यादव, डॉ. श्रीमती चांडक, डॉ. श्रीमती यादव यांच्यासह  ज्येष्ठ पत्रकार डॉ. आसाराम लोमटे, परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर, कार्याध्यक्ष प्रभू दिपके, विनोद डावरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी डॉ. एकनाथ गबाळे यांनी पत्रकारांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये तपासणी फिसमध्ये सवलत देण्याचा मनोदय व्यक्त केला तसंच जिल्ह्यात देहदान व अवयवदान याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच दरवर्षी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त देवगिरी सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये हे तपासणी शिबीर घेण्यात येणार असल्याचे संगितले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, वृत्तपत्र कर्मचारी, छायाचित्रकार त्याच बरोबर देवगिरी हास्पीटलचे विनोद गारुडी,महालॅबचे जयेंद्र गायकवाड, ओमकार पालकर, सुदाम शिंदे, अभय काळे, न्यु लाईफ ब्लड बँकेचे पंकज खेडकर व त्यांचे चमुनं पुढाकार घेतला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या