🌟छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशनच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान परीक्षांमध्ये घवघवीत यश....!


🌟भविष्यातील शास्त्रज्ञांच्या वाटचालीला सुरुवात🌟

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन गावातील विविध शाळांतील ५ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

💫होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा :-

मुंबई सायन्स टीचर असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या ६ वी आणि ९ वीतील विद्यार्थ्यांसाठीच्या या प्रतिष्ठित परीक्षेत साची धूत, श्लोक धूत, अधिराज अग्रवाल, आर्वी मुंदडा, हिमांशी मंत्री, ओम मिश्रा, पलक सोनी, सुरभी धूत, साईराज गायके, संगमेश संगेकर, आयुष निकुंभ, विराग पांडे, विराज राजपूत या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

💫नोबेल सायन्स टॅलेंट सर्च (NSTS) :-

६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या परीक्षेत मोक्ष समदरिया, प्राप्ती समदरिया, सोहम गोरे, आर्यन दुशिंग, साहस ठोळे, सम्यक सिरसाठ, भूमी मुथा, आर्यन सोनवणे, सम्यक पाटणी आणि सुहान गोसावी यांनी यश मिळवत ISRO सहलीसाठी निवड निश्चित केली आहे.

💫विद्यार्थी विज्ञान मंथन :-

केंद्र सरकारच्या विज्ञान भारती विभागामार्फत आयोजित ११ वीतील विद्यार्थ्यांसाठीच्या या परीक्षेत अधिराज अग्रवाल, अद्विक पाटील, पार्थ मुंदडा, अधिरा बुमिनाथन, संगमेश संगेकर, अन्वी मुंदडा, सम्यक सिरसाठ, निधी अजमेरा, मिस्टि समदरिया आणि जय कर्नावट यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.

लासूर स्टेशनमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात मिळवलेले हे यश गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. भविष्यात हेच विद्यार्थी देशसेवेसाठी शास्त्रज्ञ म्हणून योगदान देतील, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या