🌟पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत गुंडांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.....!


🌟छत्रपती संभाजीनगर शिवसेना महिला आघाडीची मागणी🌟


✍️ मोहन चौकेकर 

छत्रपती संभाजीनगर (दि.28 डिसेंबर 2024) : छत्रपती संभाजीनगर शहरात भरदिवसा पत्रकारावर जीवघेणा हल्ला होतो हा प्रकार निंदनीय असून शिवसेनेच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा निषेध करत  महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे यांच्या सूचनेवरून  आज (दि.28) पोलिस उपायुक्त श्री. संजय सानप साहेब यांची भेट घेत  पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना महीला आघाडी संपर्कप्रमुख सौ. प्रतिभाताई जगताप यांच्यावतीने करण्यात आली यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख जयश्री इंदापुरे, शहरप्रमुख मध्य संगीता बोरसे, शहरप्रमुख पश्चिम सुरेखा चव्हाण, शहर प्रमुख पूर्व गायत्री पटेल, विधानसभा संघटक सुनील क्षत्रिय, उपशहर प्रमुख लता त्रिवेदी, संगीता कसबेकर, सीमा शिंदे ,रेखा चव्हाण आदींची उपस्थिती होती.

वसंतराव नाईक कॉलेज समोर दिनांक २६ गुरुवार रोजी काही गुंडांची भरदिवसा हाणामारी चालू होती त्यांच्याजवळ तीक्ष्ण हत्यारे होती या हाणामारी मुळे जालना रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. याचवेळी सकाळचे पत्रकार अजय हरणे तिथून जात असताना त्यांना हा भयानक प्रकार निदर्शनास आला असता ह्या प्रकाराची प्रशासनाला माहिती देण्याच्या उद्देशाने ते आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण करत होते हे टोळक्याने पाहिले व पत्रकार अजय हरणे यांना मारहाण सुरू केली, त्यांच्या गळ्यात पत्रकाराचे ओळखपत्र घातलेले असताना सुद्धा त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

 पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजाला जातो, एखाद्या पत्रकावर असा जीवघेणा हल्ला होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय होईल ?  हे कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे ? असा प्रश्न उपस्थित होतो. अशा टवाळखोर गुंडांना वेळीच आळा घालण्याची गरज आहे नसता पोलीस प्रशासनावर नागरिकांचा विश्वास राहणार नाही.यामुळे शाळा / महाविद्यालय जवळील परिसर / बाजारपेठेत इतरत्र ठिकाणी होणाऱ्या प्रकारांवर पोलिसांनी बंदोबस्त करणे गरजेचे आहे , पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी व तात्काळ हल्ला करणाऱ्या गुंडांवर कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या