🌟पुर्णा शहरातील नर्सिंग बावडीत आढळला अनोळखी इसमाचा कुजलेला मृतदेह....!


 🌟अपघात की घातपात ? नागरिक प्रश्नार्थक मुद्रेत : पोलिस तपास सुरु🌟 

पुर्णा (दि.२६ डिसेंबर २०२४) - पुर्णा शहरातील उच्चभ्रू व गजबजलेल्या महावीर नगर परिसरातील 'नर्सिंग बावडी' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विहिरीत आज गुरुवार दि.२६ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तरंगत असल्याची घटना निदर्शनास आली सदरील मृतदेह अक्षरशः सडून गेल्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती सदरील नर्सिंग बावडीचा वापर परिसरातील खाजगी रुग्णालय,बिअरबार परमिटरुम हॉटेल/खानावळ चालक तसेच चिकन मटन शॉप दुकानदार कचरा व वेस्टेज टाकण्यासाठी करीत असल्यामुळे या विहिरीत पाणी आहे किंवा नाही याचा देखील अंदाज लावता येत नाही त्यामुळे या विहिरीत सातत्याने घटना दुर्घटना होतांना निदर्शनास येतात नागरीकांनी अनेकवेळा तक्रारी करुनही या उघड्यावरील विहिरीच्या स्वच्छता व सुरक्षेसाठी नगर परिषद कुठल्याही प्रकारची उपाययोजना करीत नसल्याने सदरील विहिर अत्यंत धोकादायक ठरत असून या परिसरात अनेक देशी/विदेशी दारू दुकानांसह बिअर बार देखील असल्यामुळे मद्य प्राशन केलेले मद्यपी या विहिरीच्या आसपास लघुशंकेसाठी देखील जातात.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पुर्णा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले सदरील अनोळखी इसमाचा मृतदेह बऱ्याच दिवसांपासून विहिरीत पडून असल्याने अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता त्यामुळे मृतदेह विहिरीतून काढण्यासाठी पोलिसांना नगर परिषद स्वच्छता विभागाला देखील पाचारण करावे लागले त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती सदरील इसमाचा अपघात की घातपात ? प्रश्नाचे उत्तर तर मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतरच समोर येईल...... 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या