🌟हा पुरस्कार आरोग्य विभागातील अपार मेहनत व समाजहितासाठी दिलेल्या समर्पित सेवांच्या प्रतीकस्वरूप🌟
नाशिक येथे आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या भव्य राष्ट्रीय सोहळ्यात ठाणे व रायगड जिल्ह्याचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी आणि परळीतील भूमिपुत्र डाॅ. रविंद्र प्रकाश जगतकर यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला हा सन्मान डाॅ. रविंद्र प्रकाश जगतकर यांच्या आरोग्य विभागातील अपार मेहनतीच्या आणि समाजहितासाठी दिलेल्या समर्पित सेवांच्या प्रतीकस्वरूप आहे.
आरोग्य व्यवस्थेत नवीन उपक्रम राबवून आणि जनहितासाठी समर्पित प्रयत्न करत डाॅ. रविंद्र प्रकाश जगतकर यांनी एक आदर्श उभा केला आहे. डाॅ. रविंद्र प्रकाश जगतकर यांच्या कार्याने आरोग्य व्यवस्थेतील नवा मापदंड स्थापित केला असून, समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांच्या संवेदनशील दृष्टिकोनाची मोठी भूमिका ठरली आहे.
💫डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांचे मनोगत :-
"हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून समाजासाठी दिलेल्या सेवांचा स्वीकार आहे. माझ्या सहकाऱ्यांचे सहकार्य, कुटुंबाची पाठराखण, आणि समाजाची साथ याशिवाय हे शक्य झाले नसते. प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी आणि समृद्ध जीवनासाठी काम करत राहणे हेच माझे उद्दिष्ट आहे. हा सन्मान मला अधिक जबाबदारीने कार्य करण्यासाठी प्रेरणा देतो"पुरस्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी डाॅ. रविंद्र प्रकाश जगतकर यांच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांना *"समाजसेवेचा दीपस्तंभ"* म्हणून गौरविले.
परळीतील भूमिपुत्र डाॅ. रविंद्र प्रकाश जगतकर यांचा हा अभिमानास्पद सन्मान केवळ त्यांचा व्यक्तिगत गौरव नसून, संपूर्ण शहरासाठी प्रेरणादायी क्षण ठरला आहे. डाॅ. रविंद्र प्रकाश जगतकर यांच्या या यशाने परळी शहराचे नाव राज्य पातळीवर उजळले आहे."डाॅ. रविंद्र प्रकाश जगतकर यांचे कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल. डाॅ. रविंद्र प्रकाश जगतकर यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा....!"
0 टिप्पण्या