🌟लेखा अधिकारी संजय पाठकला न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत सुनावली पोलीस कोठडी🌟
पुर्णा : पुर्णा पंचायत समितीतील ०१ कोटी ८३ लाख ७७ हजार ८४४ रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात पुर्णा पोलिसांनी आरोपी सहाय्यक लेखाधिकारी संजय पाठक याला ताब्यात घेतले असून त्याला पुर्णा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सोमवार १२ जानेवारी २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पूर्णा पंचायत समिती कार्यालयांतर्गत पुर्व दोन गटविकास अधिकाऱ्यांसह एकूण १० भ्रष्टाचाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या पेन्शनमध्ये महाघोटाळा केला असून तत्कालीन दोन गटविकास अधिकारी ज्यात एका महिला गटविकास अधिकारी यांचा देखील समावेश असून अन्य आरोपींमध्ये लेखापाल व काही कर्मचारी आणि खासगी व्यक्ती अशा नऊ ते दहा जणांनी पेन्शनधारकांच्या ०१ कोटी ८३ लाख ७७ हजार ८४४ रुपयांचा अपहार केला या प्रकरणात सबंधित विभागाने दोषींवर चौकशी करून कारवाई करण्याचे सांगितले होते अखेर तीन महिन्यानंतर पूर्णा पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत झालेल्या सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या पेन्शनमध्ये पावणे दोन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी मयुरकुमार आंदेलवाड यांनी मंगळवार दि.०७ जानेवारी २०२५ रोजी पूर्णा पोलिस स्ठाथानकात रितसर फिर्याद दिली त्यावरून पंचायत समितीमधील तत्कालीन महिला गटविकास अधिकारी सौ.एस.के.वानखेडे, तत्कालीन गटविकास अधिकारी जे.व्ही.मोडके, वरिष्ठ सहाय्यक एम.बी.भिसे, सहाय्यक लेखा अधिकारी एस. के.पाठक, अरविंद नामदेव अहिरे, सोनाजी नामदेव भोसले, नागेश निळकंठ नावकीकर, जयश्री टेलरींग, शेख अहर शेख समद या नऊ जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोनि विलास गोबाडे यांनी व त्यांच्या पथकाने यातील लेखापाल एस.के पाठक यांना ताब्यात घेऊन गजाआड केले.
पोलिसांनी काल गुरुवार दि.०९ जानेवारी २०२५ रोजी पुर्णा येथील न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन जानकर यांनी आरोपीस पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे......
0 टिप्पण्या