🌟शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा🌟
💫बीडमधील खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा उघड, आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशी कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले एकत्र, निलंबित पीआय राजेश पाटीलही सीसटीव्हीत ; महादेव दत्तात्रय मुंडेंचा दीड वर्षांपूर्वी परळीत खून, चेतना कळसे खून प्रकरणातही आकाचा हात, सुरेश धसांचा आरोप
💫जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज, काही दिवस बेड रेस्टचा सल्ला ; डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानचा पहिला फोटो समोर, चाहत्यांना अभिवादन करत वांद्र्याच्या घरात दाखल
💫एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याची कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, तर कुठल्याही योजनेत 2 ते 4 टक्के भ्रष्टाचार असतोच म्हणून योजना बंद करत नाही, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे स्पष्टीकरण ; शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, संगनमताशिवाय हा भ्रष्टाचार शक्य नसल्याचा आरोप
💫शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा, तर एकनाथ शिंदे पालकमंत्रिपदावरून रायगडमधील नाराज आमदारांना भेटणार ; छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यावर संजय शिरसाट आक्रमक, पालकमंत्री कसा असतो ते जिल्ह्याला दाखवणार, नाव न घेता अब्दुल सत्तारांना इशारा
💫शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही पालकमंत्र्यांच्या जिल्हा वाटपावरून धुसफूस, स्वतःचा किंवा शेजारचा जिल्हाही न मिळता दूरचे जिल्हे मिळाल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर
💫बीडच्या आष्टीमध्ये विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू, डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका ; बीडमध्ये असंवेदनशीलतेचा कळस, मृत महिलेला HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकले
💫महावितरण भरती प्रक्रियेमध्ये घोळ, परीक्षार्थी अन् विद्यार्थी संघटनेचा आरोप; कोर्टात दाद मागण्याचीही तयारी
💫पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम बाधीत 22 संशयित रुग्ण, पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग हाय अलर्टवर, आजार दुर्मीळ असला तरी धोकादायक आणि संसर्गजन्य नसल्याचा तज्ञांचा निर्वाळा
💫दिव्याखालीच अंधार, मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागालाच ध्वजारोहण आणि ध्वजवंदनातील फरक कळेना, चुकीचा आदेश व्हायरल
💫शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1400 अंकानी पडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 7 लाख कोटी रुपये पाण्यात
💫संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन, पार्थिवाला आळंदीत मुखाग्नी
💫दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या