🌟महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय🌟
पुणे :- महाराष्ट्र राज्यातील दहावी व बारावी बोर्डाच्या परिक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एसएससी- एचएससी बोर्ड) घेतला असून यासाठी नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक आता दुसऱ्या शाळा- महाविद्यालयातील असणार आहेत. दरवर्षी राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबविले जाते. त्या अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. पाच ते सात किलोमीटर अंतरावरील शाळांमधील शिक्षक विविध परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक असतील. वेळप्रसंगी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. एसएससी-एचएससी बोर्डाने मागील वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी 'सरमिसळ पद्धती'चा अवलंब केला. त्यानुसार एका परीक्षा केंद्रावर पाच किमी अंतरावरील विविध शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी बसविले. मात्र, परीक्षा केंद्रांवरील बहुतेक पर्यवेक्षक त्याच शाळेतील असल्याने कॉपी प्रकाराला पूर्णतः आळा बसला नसल्याचे दिसून आले......
0 टिप्पण्या