🌟पुर्व महिला गटविकास अधिकारी वरिष्ठ सहाय्यकासह सहाय्यक लेखाधिकारी यांचाही सहभाग🌟
पुर्णा (दि.०८ जानेवारी २०२५) : पुर्णा पंचायत समिती कार्यालय मागील अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराचा अड्डाच झाला होता पंचायत समिती अंतर्गत शेतकरी/शेतमजूरांसह सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शासनाने कार्यान्वित केलेल्या अनेक योजनांचा सोईस्कर रित्या अधिकारी/कर्मचारी व खाजगी दलाल विल्हेवाट लावत असतांना याकडे अनेक वेळा नागरिकांकडून तक्रारी करुन प्रसिद्धी माध्यमांतून बातम्या प्रकाशित करुन देखील याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत होते परंतु अखेर या भ्रष्ट व गैरकारभार पंचायत समितीचे विद्यमान गटविकास अधिकारी मयुरकुमार आंदेलवाड यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी स्वतः या विरोधात रितसर तक्रार दाखल केली ऑक्टोंबर २०२१ ते मे २०२३ या कालावधीत तब्बल ०१ कोटी ८४ लाख रुपये निधीचा अपहार केल्याबद्दल पूर्णा पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकार्यांसह वरिष्ठ सहाय्यक,सहाय्यक लेखाधिकारी यांच्यासह तब्बल दहा जनांविरोधात पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पूर्णेतील या बहुचर्चित गैर व्यवहाराबद्दल लेखा विभागातील अभिलेखांची चौकशी करावी,असे आदेश बजावले होते त्याप्रमाणे स्थापन केलेल्या चौकशी समितीने या गैरप्रकारांबाबत चौकशी करीत अहवाल सादर केला त्या अहवालात पूर्णा पंचायत समितीत ऑक्टोंबर २०२१ ते मे २०२३ या कालावधीत ०१ कोटी ८३ लाख ७७ हजार ८४४ इतक्या निधीचा अपहार विशेषतः देयके यापूर्वीच दिलेली असतांना सुध्दा बनावट देयके बनवून मोठ्या प्रमाणावर निधी उकळल्याची बाब निदर्शनास आली. त्या आधारेच पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयुरकुमार आंदेलवाड यांनी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मंगळवार ०७ जानेवारी २०२५ रोजी पूर्णा पोलिस स्थानकात या अपहार प्रकरणाबाबत फसवणूकीची तक्रार दाखल केली.त्याआधारे पूर्णा पोलिसांनी या प्रकरणात वरिष्ठ सहाय्यक एम.बी.भिसे, सहाय्यक लेखाधिकारी एस.के. पाठक, तत्कालीन गटविकास अधिकारी सौ. एस.के. वानखेडे, तत्कालीन गटविकास अधिकारी जे.व्ही. मोडके, अरविंद नामदेव अहिरे, सोनाजी नामदेव भोसले, नागेश निळकंठ नावकीकर, जयश्री टेलरिंग, शेख झहर शेख समद यांच्याविरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल केले आहेत.......
0 टिप्पण्या