🌟सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावात शासकीय गायरान मधील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांचे रस्तारोको आंदोलन.....!


🌟प्रशासनाच्या लेखी आश्वासननंतर आंदोलन मागें🌟

हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव येथील गेल्या तिन वर्षापासून शासकीय गायरान मधील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने संविधानीक मार्गाने अनेक उपोषण, मोर्चे,रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर मात्र यावर प्रशासनाकडून अजूननही कुठलीच कठोर कारवाई करण्यात आली नाही  संबंधित प्रशासनाचे अधिकारी जाणून बुजून टाळाटाळ करत असून अतिक्रमणधारकासोबत मिळता जुळता व्यवहार करत आहे  संबंधित अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे गावकरी आता त्रस्त झाले आहेत

आंदोलन असले की संबंधित अधिकारी आंदोलन स्थळी येऊन लेखी आश्वासन देत आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहेत सदर मात्र आश्वासनाची पूर्तता न करता निव्वळ ग्रामस्थांना चॉकलेट देऊन फसवणूक करत आहेत त्यात अनुषंगाने ग्रामस्थांनी पुन्हा एकदा २ जानेवारी रोजी अतिक्रमण हटवण्यासाठी मा तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं होतं सदर अतिक्रमण न हटवल्यास २० जानेवारी रोजी पानकनेरगाव फाट्यावर  आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला सदर मात्र प्रशासनाने कुठलीच कारवाई न केल्यामुळे आज २० जानेवारी रोजी पान कनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन  करण्यात आले होते  आंदोलनाची दखल घेत सेनगाव नायब तहसीलदार कारघूडे साहेब, मंडळ अधिकारी शिवानंद झोडगे, पान कनेरगाव सज्जाचे तलाठी हर्षवर्धन गवई,ग्रामविकास अधिकारी संतोष मेनकूदळे,आंदोलन स्थळी दाखल झाले  अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर आजचे आंदोलन मागे घेण्यात आले सदर.अतिक्रमण 330 मधील पाच एक्कर पाव बंद करून सदर इतर अतिक्रमण हटवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले प्रशासनाकडून 11 फेब्रुवारीपर्यंत आश्वासनाची पूर्तता न झाल्यास 12 फेब्रुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने आत्मदहनाचा इशारा देण्यात आला  व तसेच आंदोलन स्थळी सेनगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी घारगे,बिड जमादार राजेश जाधव,शिवदर्शन खांडेकर, एकनाथ राठोड,अंमलदार, इतर पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील मूकूल हांडेकर,चोख बंदोबस्त पहायला मिळाला....

✍️शिवशंकर निरगुडे (हिंगोली)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या