🌟भारतीय जनता पक्षाचे २५ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट : सदस्य अभियान अंतर्गत आजपासून राज्यव्यापी नोंदणी...!


🌟अशी माहिती पक्षाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली🌟

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे यासाठी अधिकाधिक तरुणांना भाजपसोबत जोडण्याचा संकल्प भाजपने केला आहे. यासाठी आज रविवार दि.०५ जानेवारी रोजी राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्त एकाच दिवशी २५ लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे अशी माहिती पक्षाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.

भाजप प्रदेश कार्यालयात शनिवारी आयोजित परिषदेत ते बोलत होते पत्रकार यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथून करणार आहेत. अभियानाबाबत बावनकुळे यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रत्येक बुथवरील कार्यकर्ता २५० पेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभा क्षेत्रात ५० हजार सदस्यांचे लक्ष्य

डिसेंबरपासून सुरू झालेल्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ५० हजारांहून अधिक सदस्य नोंदणीचे लक्ष्यही ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर लगेच संघटन पर्वाची सुरुवात झाली. त्यानंतर भाजपाचे विविध मोर्चे तसेच प्रकोष्ठ यांनी नोंदणी अभियानासाठी कार्यशाळाही घेतल्या होत्या. भाजप प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानामध्ये राज्यभरातून दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याची सूचना बावनकुळे यांनी दिली होती. या अनुषंगाने अभियानाला अधिक गतिमान करून सक्रिय सहभागासाठी विशेष योजना आखल्याचे चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्राला समर्पित भावनेने काम करणाऱ्या भाजपच्या या महा सदस्य नोंदणी अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या