🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟कुठल्याही योजनेत 2-4 टक्के भ्रष्टाचार होत असतो म्हणून योजना बंद केली पाहिजे असं नाही - कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

✍️ मोहन चौकेकर

💫जळगावात मोठी रेल्वे दुर्घटना, आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, विरुद्ध दिशेने येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने अनेकांना चिरडले, 9 ते 10 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती ; आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं

💫 पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’च्या 24 संशयित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार, दोन जण व्हेंटिलेटरवर असल्याची आरोग्य विभागाची माहिती ; आजाराची दाहकता लक्षात घ्या, ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी; खासदार शरद पवार यांचा राज्य सरकारला सल्ला 

 💫दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी,शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ताटातूट करणार,राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय ! 

💫खासगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रुपला लागू होणार सरकारची नियमावली 

💫आम्ही कुणाचे पैसे स्वतःहून घेणार नाही, जे स्वतःहून देतील त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील; मंत्री आदिती तटकरे यांची लाडकी बहीण योजनेबाबत माहिती  

💫महापालिका निवडणुकीनंतर अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा दावा 

💫तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रशरच्या गाड्या भरपूर,यावरुन बरंच ऐकावं लागतं, सगळी आपलीच माणसं असल्याने मी मागे जिल्हाधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यास सांगितले होते; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं सोलापुरात वादग्रस्त वक्तव्य 

💫कुठल्याही योजनेत 2-4 टक्के भ्रष्टाचार होत असतो म्हणून योजना बंद केली पाहिजे असं नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य ; कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महत्त्वाचा आदेश म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी धोरणात्मक विषयांवर बोलू नये

💫 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात अन् राज्यात पालकमंत्रीपदावरुन महायुतीत असंतोष, साताऱ्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिवेंद्रराजे भोसलेंचे समर्थक आक्रमक 

💫 सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात', सोलापूरचे पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना इशारा 

 💫बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ; न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामीनासाठी धाव, पण मकोका लागल्यानंतर 180 दिवस आरोपीला जामीन मिळत नाही, वाल्मिक कराडला पुढील सहा महिने जेलमध्येच राहावे लागण्याची शक्यता ; वाल्मिक कराडकडून जमीन हडप करण्याचा कहर, स्वत:ची जमीन चांगली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीतला मुरुम उपसला 

💫बीडमधील सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा अबाधित राहावा; मंत्री धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना ; वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले ; आम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख कुटुंबीयांची मंत्री पंकजा मुंडेंकडे मागणी

 💫मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड, तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरीक्षण नोंदवत दिला दणका ; राजकारणात अतिशय कमी काळात प्रचंड वेगाने प्रगती करणाऱ्या मंगलप्रभात लोढांच्या घरात इस्टेटीचा वाद उफाळला, प्रकरण कोर्टात

💫सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाचा आज इंग्लंडविरुद्ध पहिला टी 20 सामना, मोहम्मद शमीच्या कामगिरीकडे लक्ष, पाच सामन्यांच्या मालिकेला कोलकाताच्या ईडन गार्डनवरुन सुरुवात ; बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!

💫वाल्मिक कराडच्या पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे करोडीची मालमत्ता                                                 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या