🌟परभणी तालुक्यातील मटकऱ्हाळा-आनंदवाडी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा....!


🌟अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाला ताळे ठोको आंदोलन🌟


परभणी - तालुक्यातील मटक-हाळा ते आनंदवाडी हे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने  एप्रिल-मे  २०२४ ला सुरु करण्यात आले. संबंधीत काम कंत्राटदाराने या रस्त्यावर फक्त खडी टाकून अर्धवट सोडून दिले आहे. सदरील रस्त्याचे काम मागील ९ महिन्यापासुन बंद आहे. खडी टाकुन अर्धवट सोडुन दिलेल्या कामामुळे या रस्त्यावरन ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. या दरम्यान अनेक अपघातही या खडी मुळे झाले आहेत. संबंधीत कंत्राटदारास व सार्वजनिक बांधकाम विभागास अनेकदा विनंती करुनही हे काम अद्यापही सुरु करण्यात आलेले नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे.


मटकऱ्हाळा - आनंदवाडी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा या मागणीचे निवेदन आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले. संबंधित निवेदन कार्यालय प्रमुखांनी स्वीकारले.मटकऱ्हाळा - आनंदवाडी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया समोर डफली बजाओ आंदोलन व कार्यालयाला ताळे ठोको आंदोलन घेण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे.

 मटकऱ्हाळा ते आनंदवाडी हे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम तात्काळ संबंधीत कंत्राटदाराकडुन अथवा संबंधीत कंत्राटदार काम पूर्ण करण्यास समक्ष नसल्यास दुसऱ्या कंत्राटदाराकडून सुरु करुन पुर्ण करुन द्यावे तसेच आंदोलना वेळी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल असे ही निवेदनात म्हटले आहे.जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पोसलेल्या ठराविक लाडक्या गुत्तेदारांमुळे परभणीच्या विकास कामांचे वाटोळे झाले असून अनेक काम अर्धवट सोडून देण्यात आली तर काही काम फक्त कागदावर करून त्यांचे बिल उचलण्यात आली असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केला.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, तालुका प्रमुख उध्दव गरुड, शहर चिटणीस वैभव संघई, मटकऱ्हाळा शाखा प्रमुख माऊली गरुड, प्रकाशराव गरुड,  संतोषराव गरुड, प्रल्हाद गरुड, संतोष गरुड, सुरेश उत्तमराव गरुड इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या