🌟विद्युत पोलवर लाईटचे डिओ टाकत असतांना विद्युत वाहिनीला चिटकून कर्मचारी विशाल जोगदंडचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू🌟
पुर्णा (दि.१९ जानेवारी २०२५) :- पुर्णा शहरातील पुर्णा-झिरोफाटा मार्गावरील काबरा जिनिंग समोरील परिसरात रितसर परमीट घेऊन तसेच विद्युत प्रवाह बंद करुन विद्युत पोलवरील डिओ टाकत असतांना अचानक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील कर्मचाऱ्याने विद्युत प्रवाह सुरू केल्याने गुत्तेदारी तत्वावर फ्युज कॉलचे काम करणाऱ्या २४ वर्षीय तरुण कर्मचाऱ्याचा पोलवरच विद्युत प्रवाह वाहिनीला चिटकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय विदारक घटना आज रविवार दि.१९ जानेवारी रोजी सायंकाळी ०६.०० वाजेच्या सुमारास घडली.
पुर्णा तालुक्यातील मौ.गौर येथील रहिवासी असलेल्या विशाल सुदाम जोगदंड यांनी गुत्तेदारी तत्वावर अंदाजे सात ते आठ महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत फ्युज कॉलचे काम करण्यास सुरुवात केली होती आज रविवार दि.१९ जानेवारी रोजी सायंकाळी ०६.०० वाजेच्या सुमारास विशाल जोगदंड रितसर परमीट घेऊन काबरा जिनिंग परिसरात विद्युत खांबांवर चढून लाईटचे डिओ टाकत असतांना पुर्णेतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील कर्मचाऱ्याने विद्युत प्रवाह सुरू केल्याने विशाल जोगदंड या गुत्तेदारी तत्वावरील कामगाराचा विद्युत खांबांवरच विद्युत प्रवाह वाहिनीला चिटकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय विदारक घटना घडली असून घटनेची माहिती समजताच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विलास गोबाळे व सहकारी पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे समजते.....
0 टिप्पण्या