🌟अशी माहिती तहसिलदार बोथीकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे🌟
पुर्णा (दि.२१ जानेवारी २०२५) :- भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस २५ जानेवारी २०११ पासून देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्त पुर्णा येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती तहसिलदार बोथीकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.पुर्णा शहरातील विद्या प्रसारणी सभेचे हायस्कूल येथे उद्या बुधवार दि.२२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता निबंध व रांगोळी स्पर्धा तर गुरुवार दि.२३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता शहरातील अभिनव विद्या विहार प्रशाला येथे चित्रकला स्पर्धा तर शुक्रवार दि.२४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता शहरातील श्री.गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदारांना विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे,सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करुन घेणे, प्रत्येक निवडणुकीत मतदान करणे व लोकशाहीवर जनतेची निष्ठा ठेवण्यासाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम घेणे, विविध वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध स्पर्धाद्वारे व इतर माध्यमातून लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने जनजागृती करणे हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.१५ व्या राष्ट्रीय मतदार दिनाची यंदाची ‘मतदानासारखे काहीच नाही, मी नक्की मतदान करणार’ अशी आयोगाकडून देण्यात आली आहे.१५ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील सर्व शाळा/महाविद्यालयाने इयत्ता ०६ वी ते इयत्ता ०८ वी आणि इयत्ता ०९ वी ते इयत्ता १२ वी असे दोन गट तयार करून त्यांची निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धासाठी एकाची निवड करणे. त्यानंतर शाळास्तरावर निवड केलेल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा तालुकास्तरावर २४ जानेवारी रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून प्रथम, दितीय व तृतीय क्रमांक येणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदान केंद्रावर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिका-यामार्फत दि.२५ जानेवारी २०२५ रोजी १५ व्या राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यावेळी नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात यावेत. मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध व्हिडीओ, व्होटर हेल्पलाईन, ऑनलाईन इपिक कार्डबद्दल माहिती देणार आहेत. तसेच मतदान केंद्रावर शपथ देण्यात येणार आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त नव मतदार आणि जनतेने सहभाग नोंदवावा. तालुक्यातील सर्व नवमतदारांनी नावनोंदणी मतदार यादीमध्ये करून घ्यावी. तसेच सर्व जनतेने सर्व निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीवर निष्ठा वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुर्णा शहरातील शाळा, महाविद्यालयातील इयता ०८ वी ते १२ वी मधील विद्यार्थी रॅली सकाळी ०८.०० वाजेदरम्यान संबंधित शाळा, महाविद्यालयापासून निघून गट शिक्षणधिकारी, गट साधन केंद्र मैदान, बौध्द विहार जवळ, बसस्थानक रोड, पूर्णा येथे सकाळी ०९.०० वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय मतदान दिनाची प्रतिज्ञा व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.....
0 टिप्पण्या