🌟वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील वडार (तांडा) येथील समाजमंदिर निर्माणासह स्मशानभुमीचे सौदर्यीकरण करा..‌.!


🌟सामाजिक कार्यकर्ते रामाभाऊ कुर्‍हाडे यांचे आमदार खोडे यांना लेखी निवेदन🌟

फुलचंद भगत

वाशिम : वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील मौजे पेडगाव (तांडा) येथील वडार समाज मंदिराचे निर्माण व स्मशान भुमीचे सौंदरीकरण करण्याकरीता निधी उपलब्ध करुन द्यावा या मागणीसाठी सामाजीक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी वाशिम जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी रामा बाबुराव कुन्हाडे यांनी आमदार श्याम खोडे यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

                मौजे पेडगाव (तांडा) ता. मंगरुळपीर जि. वाशीम येथे वडार समाजाची ३०० ते ३५० घराची वस्ती आहे. सदर गावाच्या शिवारात परीसरात वडार समाजाचे मंदीर (देवस्थान) नाही त्यामुळे वडार समाजाला देवाला प्रार्थना करता येत नाही.तसेच सदर गावामध्ये मृतदेह जाळण्याकरीता स्मशानभुमी असून सदर स्मशानभुमीची अवस्था अत्यंत खराब स्थितीत आहे त्यामध्ये मृतदेह जाळणे खुप कठीण झाले आहे.तरी पेडगाव (तांडा) या गावामध्ये वडार समाज मंदीराचे निर्माण करणेकरीता व स्मशानभुमीचे सौंदरीकरण करणेकरीता निधी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामा कुर्‍हाडे यांनी लेखी निवेदनाव्दारे वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे यांचेकडे केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या