🌟सेलूत राज्यातील २५६ तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचा राज्यस्तरीय मेळावा🌟
सेलू (दि.२२ जानेवारी २०२५) :- मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यातील सर्व तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांच्या स्वागतासाठी सेलू नगरी सज्ज असून या शहराची ओळख सांस्कृतिक नगरी असल्याने हा सोहळा दिमाखदार होणार असल्याची माहिती साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंत आडळकर यांनी दिली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचा राज्यातील २५६ तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ०१ फेब्रुवारी २५ रोजी सेलू येथील साई नाट्य मंदिर येथे संपन्न होत आहेत या मेळाव्या बाबत आडळकर बोलत होते .ते पुढे म्हणाले की सेलू शहरात प्रथमच राज्यभरातून पत्रकार येत आहेत . सेलू शहरात त्यांच्या स्वागतासाठी कशाचीच कमतरता जाणवणार नाहीए. या ठिकाणी अद्यावत सभागृह,उत्तम निवास व्यवस्था आहे तसेच सेलूवासीय आदरतिथ्य करण्यात नेहमीच पुढाकार घेतात या मेळाव्यातुन ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न आणि समस्या यांची चर्चा होऊन ते मार्गी लावावेत अशी अपेक्षा आडळकर यांनी व्यक्त केली आहे .राज्यभरातुन येणाऱ्या पत्रकारांसाठी उत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयन्तशील आहोत असेही ते यावेळी म्हणाले. या मेळाव्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस प्रा सुरेश नाईकवाडे, जिल्हादयक्ष प्रभू दिपके, जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास, तालुका अद्यक्ष लक्ष्मण बागल, मोहसीन अहमद, कांचन कोरडे, नीरज लोया, निसार पठाण, लक्ष्मण माणोलीकर, राजू हट्टेकर परिश्रम घेत आहेत......
0 टिप्पण्या