🌟शिवसेना वैद्यकीय मदतकक्ष जिल्हा प्रमुख अनुराधा टाक यांच्या वतीने मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न...!


🌟परभणी शहरातील परसावत नगर येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे करण्यात आले होते आयोजन🌟

परभणी :- परभणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख सौ. अनुराधा टाक यांच्या वतीने मकर संक्रांत निमित्त भव्य स्वरूपात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन परभणी शहरातील परसावत नगर येथे शनिवार दि.१८ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला शिवसेना महीला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ.गिताताई बालाजीराव सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी शिवसेनेतील संपुर्ण महिला पदाधिकारी व परसावत नगर येथील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या