🌟पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्रासाठी प्रलंबित असलेले ८७ अर्ज मंजूर.....!


🌟महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिल्यानंतर प्रशासनाला आली जाग🌟

मुंबई :- राज्यातील पारधी समाजातील विद्यार्थ्यांना अनेक खेटे घालूनही जात प्रमाणपत्र दिले जात नाही. दोन दोन वर्षे जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे काही विद्यार्थिनींवर शिक्षण अर्धवट सोडून लग्न करण्याची वेळ आली. शेवटी या प्रकरणाची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली. जात प्रमाणपत्रासाठी प्रलंबित असलेले ८७ अर्ज मंजूर करण्यात आले असून लवकरच संबंधितांना जात प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे.

महसूल प्रशासनाकडून जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रत्येकाला १९५० पूर्वीचा पुरावा बंधनकारक आहे. मात्र, पारधी समाजातील यापूर्वीच्या पिढ्या जंगल खोऱ्यात भटकं जीवन जगत असल्यामुळे अनेक पारधी विद्यार्थ्यांकडे त्यांच्या आधीच्या पिढीचे (पूर्वीजांचे) जातीचे दाखले व इतर पुरावे नाहीत. त्यामुळे अनेक होतकरू पारधी विद्यार्थ्यांना आदिवासी म्हणून जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करून दोन- दोन वर्ष उलटले, तरी त्यांना नागपूर जिल्ह्यात प्रशासनाने जात प्रमाणपत्र दिलेले नाही. अर्ज केल्यानंतर दोन दोन वर्षे जात प्रमाणपत्र दिले जात नव्हते, यासाठी जबाबदार अधिकारी कोण, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या